सुहास खामकर हा एक व्यावसायिक भारतीय शरीरसौष्ठवपटू आहे. सुहासने मिस्टर इंडिया, मिस्टर एशियासह अनेक खिताब जिंकले आहेत. याशिवाय त्यांना मिस्टर आफ्रिका 2010, मिस्टर ऑलिम्पिया, मिस्टर महाराष्ट्र अशा पदव्या मिळाल्या आहेत. तो 7 वेळा मिस्टर इंडिया आणि एकदा एशियन चॅम्पियन बॉडी बिल्डर ठरला आहे. 'भारतश्री' विजेता विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी राजवीर या चित्रपटात सुहास प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हिंदी भाषेत असलेल्या या चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीत आणखी एका नायकाची एन्ट्री झाली आहे. राजवीर या चित्रपटात एका आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहासनं राजवीर ही भूमिका साकारली आहे.