सध्या छोट्या पडद्यावर एक चेहरा सातत्याने आपल्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घालतोय तो म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत तेजश्री मुक्ताच्या भूमिकेतून रोज आपल्या भेटीस येते. या मालिकेत तिचा साधा आणि सोज्वळ असा साडीतला लूक प्रेक्षकांच्या तर पसंतीस येतोच आहे. पण, तेजश्री जितकी ऑनस्क्रीन सुंदर दिसते त्याहून अधिक ती ऑफस्क्रीन सुंदर दिसते असं म्हटलं तरी हरकत नाही. नुकतेच तेजश्रीने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये तेजश्री सुट्टीचा मनसोक्त आनंद घेताना दिसतेय. या पोस्टला तिने 'Happy Life' असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये तेजश्री निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंद लुटताना दिसतेय. चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तेजश्री सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात.