अभिनेत्री जुई गडकरीने नुकताच तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. छोट्या पडद्यावर पदार्पणापासूनच आपल्या अभिनयाने छाप सोडणारी अभिनेत्री जुई गडकरी कायमच चर्चेत असते. तिची मुख्य भूमिका असलेली 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चांगलीच आघाडीवर आहे. जुई साकारत असलेली सायली ही व्यक्तीरेखाही लोकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या जुई गडकरीच्या लग्नाची प्रतिक्षा तिच्या चाहत्यांना आहे. जुई चे इंस्टाग्राम वर 392 k फॉलोवर्स आहेत. जुई सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे.