विराट कोहली (virat kohli) आणि अनुष्का शर्माच्या (anushka sharma) वर्षाच्या गुंतवणुकीत झाली आहे वाढ.
विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने सर्वात जास्त धावा केल्या आहेत.
त्यामुळे ऑरेंज कॅपचा मानकरी सध्या विराट कोहली आहे.
GO Digit ही विमा उत्पादने विकणारी कंपनी पुढील आठवड्यात IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) घेऊन येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कंपनीचा IPO 15 मे रोजी येईल.
या कंपनीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे शेअर्स आहेत.
त्यामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्माला चांगला नफा मिळणार आहे.
या गुंतवणुकीमुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्माला अंदाजे 262 टक्के परतावा मिळेल.
या गुंतवणुकीतून दोन्ही जोडप्यांना 6 कोटींहून अधिक नफा मिळणार आहे.