नवीन वर्षातही काही स्टार किड्स मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत.
यामध्ये अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शकांची मुले फिल्मी करियरला सुरुवात करणार आहेत.
संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आँखों की गुस्ताखियाँ चित्रपटात दिसणार आहे.
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खान इब्राहिम अली खान सरजमी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे.
चंकी पांडेचा भाचा अहान पांडे मोहित सुरी दिग्दर्शिक एका लव्ह स्टोरीमधून तो मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
रवीना टंडनची लेक राहा थडानी 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
राहा थडानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, डेब्यू करण्याआधीच तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
अजय देवगणचा भाचा अमन देवगण 'आझाद' चित्रपटातून डेब्यू करणार आहे.
'आझाद' चित्रपटातून अजय देवगण भाचा अमन देवगण आणि राहा थडानी यांना लाँच करणार आहे.
दिग्दर्शिक इंद्र कुमार यांचा मुलगा अमन इंद्र कुमार लवकरच 'तेरा यार हूँ मैं' चित्रपटातून बॉलिवूड करियरला सुरुवात करणार आहे.