वेळ पाहण्यासाठी कमी आणि स्टाईलच्या नावाखाली हातात घड्याळ घालणे, हे खूप सामान्य झालं आहे.
पुरुष डाव्या आणि महिला उजव्या हातात घड्याळ घालतात, हे तुम्ही नक्कीच पाहिले असेल.
महिला उजव्या आणि पुरुष डाव्या हातात घड्याळ का घालतात?
यामागचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का?
हातात घड्याळ घालणे, हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विषय असतो आणि हातात घड्याळ घालणे याचा काही नियम नाही.
पुरुष हा डाव्या हातात घड्याळ घालतात, याचं मुख्य कारण म्हणजे आपलं घड्याळ हे सुरक्षित आणि व्यवस्थित राहावे असं लोकांचा समज आहे.
पुरुष जर एखादं काम करण्यात व्यस्त असतील तर त्यांना सतत वेळ बघण्यासाठी ते डाव्या हातात घड्याळ घालणे योग्य समजतात.
महिलांसाठीही असा कोणता योग्य नियम नाही. महिला नेहमी त्यांच्या आवडीनिवडीनुसार, दोन्ही हातांपैकी कोणत्याही हातात घड्याळ घालणे योग्य समजतात.