महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दकी यांच्यावर शनिवारी संध्याकाळी मुंबईतील वांद्रे पूर्वमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. मनोरंजनसृष्टीतही अनेकांशी घनिष्ठ संबंधांसाठी ओळखले जाणारे बाबा सिद्दकी यांच्या हत्येवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केलाय. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त बातमी मिळताच तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचले. शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा हे दोघेही सिद्दकी यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी रुग्णालयात गेल्याचे दिसून आले. झहीर इक्बालचे वडील इक्बाल रतनसी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी समजताच सलमान खानने लिलावती रुग्णालयाकडेस धाव घेतली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काहीवेळापूर्वीच लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. आशिष शेलार रुग्णालयात दाखल झाले होते.