‘येक नंबर’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. बॉलिवूडला भुरळ घालणारी मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या रॅपसाँगमधून मलायका आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ केले आहे. मलायका अरोराला तिच्या वर्कआउट्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा तिच्या रिल लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायकाचे इंस्टाग्राम वर 18.9 M फॉलोवर्स आहेत. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मलायका प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असते.