आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी गुणरत्न सदावर्ते कायमच चर्चेत असतात. सुप्रीम कोर्टात आरक्षणाचा खटला चालवणारे सदावर्ते आता बिग बॉसमध्ये स्पर्धक आहेत. यात दाऊदच्या धमकीच्या फोनपासून ते जेलमध्ये भेटलेल्या डॉक्टरपर्यंतचे अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले आहेत. बिग बॉसच्या घरात येण्याआधी आपल्याला धमकीचे फोन आले होते. ते दुसरे तिसरे कोणाचे नाही तर दाऊदचेच असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. हे धमकीचे फोन कराची होऊन आल्याचेही त्यांनी सांगितलं. आपण त्याच्या विरोधात काही केस लढत असल्याने हे फोन येत असल्याचेही सदावर्ते यांनी सांगितलं. आता त्यांच्या या धक्कादायक खुलाशांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता बळवली आहे.