दिशा पटानी आज बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
दिशा पटानीचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये झाला आहे.
सलमान खान, टायगर श्रॉफसारख्या बड्या कलाकारांसोबत
काम करणाऱ्या दिशाने कधीच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं.
दिशा आणि अभिनय क्षेत्राचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता.
दिशाने शास्त्रज्ञ होण्याचं बालपणीच ठरवलं होतं.
त्यादृष्टीने पाऊल उचलत तिने लखनऊमधील
एमिटी युनिवर्सिटीमधूल इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं.
महाविद्यालयात असताना तिने मॉडेलिंगमध्ये काम करायला सुरुवात केली
आणि हाच तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.
वयाच्या 17 व्या वर्षी दिशाने पहिलं फोटोशूट केलं
आणि ग्लॅमरस जगासोबत ती जोडली गेली.