मिस वर्ल्ड (miss world) ऐश्वर्या राय बच्चननेही 2024 च्या कान्स फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला.
हे कान्स फेस्टिवल फ्रांसमध्ये पार पडले.
जगभरात आंतरराष्ट्रीय स्थरावर कान्स फेस्टिवला विशेष महत्व दिले जाते.
यावेळेला ही हॉलीवूड सह बॉलीवूड अभिनेत्यांचा रेड कार्पेटवर जलवा पाहायला मिळाला.
कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायचा पहिला लुक समोर आला आहे.
काळ्या रंगाचा डार्क ब्लॅक गाऊन घालून ऐश्वर्या कान्स फेस्टिवलमध्ये झळकली.
सोबतचं तिच्या हाताच्या दुखापतीमुळे ऐश्वर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हाताला दुखापत असतानाही ऐश्वर्या राय हीने या फेस्टिवलला आपला सहभाग नोंदवला.
तिच्या या लुकला बघून तिचे चाहते थक्क झाले.
सोशल मीडियामध्ये सर्वत्र ऐश्वर्याची चर्चा होत आहे.