बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पदुकोण हिने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जगातील सौंदर्यवान महिलांच्या टॉप 10 यादीत स्थान मिळवलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे यादीत स्थान मिळवणारी दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय महिला आहे.

या नवीन रेकॉर्डसह दीपिका पदुकोणने प्रियंका चोप्रा, आलिया भट, श्रद्धा कपूर यांसारख्या स्टार अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.

लंडनमधील कॉस्मेटिक सर्जन जुलियन डी सिल्वा यांनी तयार केलेल्या जगातील सौंदर्यवान अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोणचं नाव समाविष्ट आहे.

हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिकांसह अनेक प्रसिद्ध इंटरनॅशनल आयकॉन यांचा या यादीत समावेश आहे.

दीपिकाचा या यादीत समावेश असून तिला 91.22 टक्के गुण देण्यात आले आहेत.

हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झेंडया हिने 94.37 टक्के गुणांसह या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

जगातील सर्वाधिक सुंदर टॉप 10 महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर किलिंग इव्ह स्टार जोडी कॉमर आहे.

जोडीने 94.52 टक्के गुणांसह जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब पटकावला आहे.