बॉलीवूडच्या ग्लॅमरस लिस्टमध्ये अभिनेत्री दिशा पाटनीचे नाव नक्की येतं.
दिशा आपल्या बोल्ड अँड ग्लॅमरस लूकसाठी नेहमी चर्चेत असते.
दिशाने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी आणि अनोखी अशी ओळख निर्माण केलेली आहे.
अभिनेत्री दिशा पाटनी 13 जूनला 32 वर्षाची झाली.
तिने तिचा 32 वा वाढदिवस साजरा केला आहे.
तिच्या वाढदिवसाच्या निमित्त जाणून घ्या दिशा बद्दल काही खास गोष्टी.
एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातून आपल्या बॉलीवूड करिअरची सुरवात केली.
या नंतर दिशाचा सलमान सोबत स्लो मोशन हे गाणे सुपरहिट ठरले.
आता ती तिच्या आगामी सिनेमाची तयारी करत आहे.
तिच्या या चित्रपटाचे नाव कल्की 2898 AD आहे.
कल्की 2898 AD या सिनेमाची चर्चा सोशल मीडियावर नेटकाऱ्यांमध्ये रंगली आहे.