'बिग बॉस मराठी' च्या यंदाच्या सीझनमधील सहावा आठवडा आता पूर्ण होणार आहे. या आठवड्यातही टास्कमध्ये जोरदार राडा झाला. घरातील सदस्यांना बिग बॉसने सरप्राईज देत रेन डान्स करण्यास सांगितले. बिग बॉसने खास आपल्या शैलीत घरातील सदस्यांना आज तुम्हाला पावसात भिजण्याचा आनंद देणार असल्याचे सांगितले. या रेन डान्समध्ये घरातील सदस्य चांगलेच थिरकले. घरातील सदस्यांना आपल्या तालावर नाचवणारी निक्की तांबोळी देखील थिरकली. 'कोणी ढगाला लागली कळं' तर 'कोणी टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर डान्स करताना दिसून येणार आहे. घरातील सर्व सदस्यांना नाचवणारी निक्की 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर रेन डान्स करताना दिसणार आहे. निक्कीसोबत अरबाजदेखील तिचा डान्स एन्जॉय करताना दिसणार आहे. एकंदरीतच 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज एक वेगळाच माहोल तयार होणार आहे.