स्टार प्रवाह प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा नवी मालिका घेऊन येत आहे. बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेचे नाव येड लागलं प्रेमाचं असे आहे. मालिकेत तो इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे ही मालिका चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. जय हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो नेहमी आपल्या चाहत्यांसाठी instagram वर काही ना काही पोस्ट करत असतो. त्याच्या उत्तम फिटनेसमुळे तो चाहत्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. स्टार प्रवाहवर 27 मे पासून रात्री 10 वाजता येड लागलं प्रेमाचं या मालिकेची सुर्वात होत आहे.