बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Facebook

घरात शिरुन चोराने सैफवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Image Source: Facebook

मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Image Source: Facebook

चोराला पाहून सैफच्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केला.

Image Source: Facebook

त्यावेळी सैफ अली खानला जागा झाला.

Image Source: Facebook

रूममधून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर समोरासमोर आले.

Image Source: Facebook

यावेळी चोरानं पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील धारदार शस्त्राने सैफ अली खानवर वार केले.

Image Source: Facebook

यामध्ये सैफला दुखापत झाली.

Image Source: Facebook

सैफ अली खान जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.

Image Source: Facebook

या गोंधळात चोरानं पळ काढला.

Image Source: Facebook

मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं आहे.

Image Source: Facebook

सध्या सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Image Source: Facebook