मराठीसह हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
आजवर आपल्या नानाविध भूमिकांनी तिने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली.
पण तिला खरी ओळख 'दायरा' या हिंदी चित्रपटातून मिळाली. सोनाली कुलकर्णीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोनाली एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती आणि लेखिका देखील आहे. तिने मराठी ते हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सोनाली कुलकर्णीच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंकडे चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.
सोनालीने लाल रंगाच्या प्रिंटेड आणि डिझाइनर ड्रेसमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.
कमीत कमी मेकअप असलेल्या या साध्या लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
दरम्यान, सोनाली तिच्या आगामी ‘सुशिला सुजित’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.