टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर हिला अतिशय कमी वयात मोठे यश मिळाले आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या अवनीतने टीव्ही आणि ओटीटीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अवनीत कौर टीव्हीसोबतच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिच्या इंस्टाग्रामवर ३ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर लाखो लाइक्स आणि कमेंट्स येतात. तिचा ग्लॅमरस अंदाज आणि फॅशन सेन्समुळे ती तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे.

अवनीत कौर तिच्या सौंदर्यावरून नेहमीच चर्चा रंगत असतात. काही लोक तिला प्लास्टिक सर्जरी केल्याचा आरोप करत ट्रोल करतात.

अवनीतने नुतकतेच इन्स्टा वर काही फोटो शेअर केले आहेत.

ज्यात अवनीत निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

कपाळावर टिकली आणि मोकळे केस अवनीतवर खुलून दिसतायत.