१४ वर्षांपूर्वी, म्हणजेच २०११ मध्ये, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने अभिनेता नंदीश संधूशी लग्न केले. पण रश्मीचा पहिला संसार अवघ्या ५ वर्षातच मोडला.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
रश्मीने तिच्या आयुष्यात अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना केला आहे.
‘उतरन’मधून लोकप्रिय झालेल्या रश्मीला बऱ्याच गोष्टींबद्दल संघर्ष करावा लागला.
‘बिग बॉस १३’च्या घरातील टॉप ५ स्पर्धकांमध्ये असलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
बिग बॉसच्या घरात अनेकदा तिचा नो-मेकअप लूक दिसला आणि तरीही ती प्रेक्षकांना नेहमीच आकर्षक वाटली
रश्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तिचे इन्स्टाग्रामवर 5.9M फोल्लोवर्स आहेत.
नुकताच रश्मीने एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
रश्मीने पांढऱ्या रंगाची साडी नेसलीये, आणि डोळ्यावर गॉगल घातला आहे.