द जो रोगन एक्सपीरियंस' हा जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली पॉडकास्टपैकी एक आहे.

द जो रोगन एक्सपीरियंस' ला लाखो नियमित ऐकणारे दर्शक आहेत.

'जो रोगन' चा प्रत्येक एपिसोड जगभरातून लोक पाहतात.

हा पॉडकास्ट 2009 पासून सुरू आहे आणि आजही त्याची लोकप्रियता कायम आहे.

जो रोगन आपल्या पॉडकास्टमध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करतो.

त्यांच्यासोबत विज्ञान, कला, क्रीडा, राजकारण, तत्वज्ञान अशा अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा करतात.

इलॉन मस्क, एडवर्ड स्नोडेन, नील डीग्रास टायसन यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आहे.

जो रोगनची बोलण्याची शैली आणि कोणत्याही विषयावर थेट आणि स्पष्टपणे मत मांडण्याची पद्धत लोकांना आवडते.

जो रोगन जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पॉडकास्टर्सपैकी एक आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.