मिथिलाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. 'कप सॉन्ग' मुळे मिथिला पालकरला विशेष लोकप्रियता मिळाली. मिथिलानं ‘लिटिल थिंग्स’ या वेब सीरिजमध्ये काम केलं. तसेच 'कारवां' या चित्रपटाच्या माध्यमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मिथिला ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मिथिलाचे इंस्टाग्राम वर 3.9 M फॉलोवर्स आहेत. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.