जिया शंकर ही मराठी आणि हिन्दी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे जियाला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. जियाने वेड या चित्रपटात रितेश देशमुखसोबत अभिनय केला आहे. ती बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होती. मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्री जिया तिच्या सिझलिंग फोटोंमूळे खूप चर्चेत असते. ती नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते ती तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमी घायाळ करते. या फोटोमध्ये जिया तिच्या प्रिन्सेस लूकमध्ये खूपच सुंदर दिसून येतेय.