भूमी पेडणेकर हिचा जन्म 18 जुलै 1989 रोजी झाला. भूमीचा जन्म मुंबईत झाला. भूमीचे वडील सतीश पेडणेकर राजकारणी होते.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

भूमीने मुंबईतील आर्य विद्यामंदिरमधून शालेय शिक्षण केलं. त्यानंतर तिने मुंबईतच कॉमर्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. यानंतर तिने यशराज फिल्ममध्ये सहा वर्षे कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं.

भूमी पेडणेकरने 'दम लगाके हैशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

भूमी पेडणेकरने या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी सुमारे 12 किलो वजन वाढवलं ​​होतं. या चित्रपटानंतर तिने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि वर्कआउटसह डाएट फॉलो करून सुमारे 33 किलो वजन कमी केलं

अभिनेत्री भूमी पेडणेकरने बॉलीवूड तसेच फॅशन जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भूमीने नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे.

भूमी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते, नवनवे लुक्स ती चाहत्यांसोबत शेअर करते.

नुकताच तिने नवा लूक शेअर केलाय ज्यात ती रेड स्कर्ट मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

यासोबत तिने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.