बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा सध्या चर्चेत आहेत.

अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या.

नुकतेच एका दिवाळी पार्टीत तमन्ना आणि विजय एकत्र स्पॉट झाले आहेत.

आता त्यांच्या लग्नासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे.

तेलुगू वन न्यूजच्या रिपोर्टनुसार, तमन्ना आणि विजय जोडीदार म्हणून एकमेकांचा विचार करत आहेत.

आपल्या नात्याला नवं नाव देण्याचा ते विचार करत आहेत.

अद्याप त्यांनी त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही.

तमन्ना आणि विजयचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.