विकी कौशलचा 'सॅम बहादुर'हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमाच्या रिलीजआधी विकीने अमृतसरला जाऊन सुवर्ण मंदिराचं दर्शन घेतलं आहे.

विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.

अभिनेता विकी कौशलने सुवर्ण मंदिरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये विकी कौशलसोबत मेघना गुलजार आणि अभिनेत्री सान्या मल्होत्राही दिसत आहे.

विकीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,शुक्र, सब्र, सुकून.

विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा सिनेमाही 1 डिसेंबरलाच प्रदर्शित होत आहे.

मेघना गुलजार यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

नुकतचं या सिनेमातील 'रब का बंदा'हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे.