छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार



शिवानीने अवघ्या काही कालावधीत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.



ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेकदा चर्चेत असते.



सध्या सोशल मीडियावर शिवानीने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची बरीच पंसती मिळतेय.



शिवानीने तिच्या सोशल मीडियावर तिचे साडीतले काही फोटो शेअर केलेत.



ज्यामध्ये जणू ती अप्सराच दिसत असल्याच्या कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत.



पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये शिवानीच्या या फोटोंवर चाहते फिदा झालेत.



दरम्यान तिच्या निखळ हास्यावर देखील चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.



गळ्यात नाजुकशी ठुशी, नाकात नथ असा मराठमोळा साज शिवानीने केलाय.