राखी सावंतने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक आलिशान लाल रंगाची BMW कार दिसत आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे राखीला ही कार भेट म्हणून मिळाली आहे. हा व्हिडिओ शेअर करत राखीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझी नवीन गिफ्टेड कार. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सगळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही महिन्यांपूर्वी राखी एका आलिशान कार शोरुमबाहेर दिसली होती. तेव्हा पापाराझींनी तिला कार खरेदी करतेय का, असा प्रश्न विचारला होता त्यावर तिने उत्तर दिले होते की, नवीन कार घेण्यासाठी माझ्याकडे 50-60 लाख रुपये नाहीत.