माजी क्रिकेटर आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धूचा मुलगा करण सिद्धूने इनायत रंधावासोबत लग्न केले. हे लग्न पटियाला येथे झाला. गुरुवारी (7 डिसेंबर) सिद्धू कुटुंबाकडून पटियाला येथील नीमराना हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले. करण सिद्धू आणि इनायत रंधावा यांचा जूनमध्ये साखरपुडा झाला होता. करणने लग्नात क्रीम कलरची शेरवानी घातली होती. त्यासोबत त्याने गुलाबी रंगाची पगडी बांधली होती. तर, इनायत गुलाबी रंगाच्या भारी लेहेंग्यात दिसली. दोघही एकत्र खूप सुंदर दिसत होते. करण आणि इनायत बराच काळ एकमेकांना डेट करत होते आणि आता लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत.