माजी मिस इंडिया आदिती आर्या ही लग्नबंधनात अडकली आहे. आदिती आर्यानं जय कोटकसोबत लग्नगाठ बांधली आहे. मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आदिती आणि जय यांचा विवाह सोहळा पार पडला. गुरुग्रामची राहणारी अदिती ही 2015 मध्ये फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा जिंकली होती. तसेच तिने चीनमध्ये पार पडलेल्या मिस वर्ल्ड 2015 या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आदितीने 2021 मध्ये ‘83’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जय कोटक आणि आदिती आर्या यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामधील आदितीच्या ब्रायडल लूकनं अनेकांचे लक्ष वेधले, रेड कलरचा लेहंगा आणि गोल्डन अँड ग्रीन कलरचे दागिने असा खास लूक आदितीनं विवाह सोहळ्यासाठी केला होता. आदितीचा पती जय कोटक हा बँकिंग टायकून उदय कोटक यांचा मुलगा आहे.