अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानचा विविह सोहळा लवकरच पार पडणार आहे. मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत आयरा लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच आयराचे केळवण पार पडले आहे. तसेच केळवणाच्या कार्यक्रमात आयरानं खास उखाणा देखील घेतला. ती म्हणते,मला मराठी येत नाही पण पॉपोयसाठी मी कधी नाही म्हणत नाही एका मुलाखतीमध्ये आमिरनं सांगितलं, आयरा ही 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज करत आहे. त्यांचा लग्नसोहळा राजस्थानमधील उदयपूर येथे होणार आहे. 13 जानेवारी रोजी मुंबईत आयराचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन होणार आहे, आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती.