अभिनेता रणदीप हुड्डा 29 नोव्हेंबर रोजी त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत विवाहबद्ध झाला.

रणदीप हुड्डाने मुंबईत त्याच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले होते,

या रिसेप्शनची काही छायाचित्रे अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत.

त्यांच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या रिसेप्शनमध्येही हे जोडपे अतिशय पारंपारिक शैलीत दिसले.

रणदीप आणि लिनच्या या फोटोमध्ये दोघेही स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे.

रणदीपची पत्नी लिन ही मणिपूरची रहिवासी आहे.

रणदीपने लिनच्या घरी लग्न केले आणि तिथल्या पारंपारिक पद्धतीने त्याच्या लग्नाचे विधी पार पाडले.

या जोडप्याच्या लग्नातील साधेपणा आणि लिनने तिच्या पतीबद्दल दाखवलेला आदर चाहत्यांना आवडला आहे.

त्यांच्या चात्यांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

तसेच त्यांनी शेअर केलेल्या फटोला भरभरून लाईक देखील दिले.