सॅम बहादुर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. विकी कौशलचा 'सॅम बहादुर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ठीक ठाक कमाई केली होती. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 6.25 कोटींची कमाई केली होती. सॅम बहादुर' हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. मेघना गुलजार (Meghna Gulzar) यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'सॅम बहादुर'ने 9 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच दोन दिवसांत या सिनेमाने 15.25 कोटींची कमाई केली आहे. सॅम बहादुर'च्या कमाईत वाढ झाल्याने विकीचे चाहते आनंदी झाले आहेत.