बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह (Badshah) अनेकदा आपल्या गाण्यांमुळे आणि रॅप सॉन्गमुळे चर्चेत असतो.

भारतातच नव्हे तर जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

पण आता बादशाह एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत (Hania Aamir) बादशाहचं नाव जोडलं जात आहे.

सध्या बादशाह पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला डेट करत असल्याची चर्चा आहे.

हानिया आमिरने अनेक उर्दू मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे.

'जनान' या विनोदी सिनेमाच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.

या सिनेमानंतर जगभरात ती ओळखली जाऊ लागली.

भारतात हानियाचा मोठा चाहतावर्ग आहे.

पाकिस्तानमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये हानिया आमिरचा समावेश होतो.