अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

ऐश्वर्याने सोशल मीडियावर वडिलांच्या जयंतीनिमित्त काही फोटो शेअर केले होते.

तसेच तिची लेक आराध्यासोबतचेही फोटो शेअर केले होते.

पण या सर्व फोटोत अभिषेक बच्चन कुठेही दिसला नाही.

ऐश्वर्याने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं होतं.

तुमच्यावर प्रेम करते. प्रचंड गोड आजोबा... प्रेमळ, दयाळू, तुमच्यासारखं या जगात दुसरं कोणी नाही.

ऐश्वर्याने शेअर केलेल्या या फोटोवर अभिषेकसोबतचा फोटो का शेअर केला नाहीस?

अशा कमेंट्स देखील तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरू आहे.

घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप ऐश्वर्या किंवा अभिषेकने काहीही उत्तर दिलेलं नाही.