बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. आलिया भट्ट बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'फिल्मफेअर ओटीटी अवॉड्स 2023' हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या बहुचर्चित पुरस्कार सोहळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक सिनेमे आणि वेबसीरिजला पारितोषिक मिळालं आहे. चित्रपट विभागात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. आलियाच्या डार्लिंग्स या चित्रपटास हा पुरस्कार मिळाला. या पुरस्करासाठी आलियाने केलेला लूक खूपच सुंदर होता. फोटोंमध्ये आलिया काळ्या रंगाच्य साडीमध्ये दिसत आहे. सोनेरी रंगाचे दागिने आणि खुले केस यामध्ये आलियाचा ग्लॅमरस लूक. आलिया तिच्या चाहत्यांना ऑटोग्राफ देतानाचा क्षण..