'गोल्डन मॅन', 'डिस्को किंग' अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांची आज जयंती आहे.
'डिस्को किंग ऑफ इंडिया' म्हणून बप्पी लाहिरी ओळखले जात.
बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या सिनेमांतील गाणी बप्पी लाहिरींनी गायली आहेत.
बप्पी लाहिरी यांनी 1973 साली 'नन्हा शिकारी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
मिथुन चक्रवर्तीच्या 'डिस्को डान्सर' या सिनेमामुळे बप्पी लाहिरी प्रकाशझोतात आले.
अनेक सिनेमांसाठी त्यांनी गायक आणि संगीतकार म्हणून काम केलं आहे.
बप्पी लाहिरी यांचे खरे नाव आलोकेश लहरी असे होते.
बप्पी लाहिरी यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक हिट गाणी दिली आहेत.
'यार बिना चैन कहा रे', 'याद आ रहा है तेरा प्यार', 'रात बाकी, बात बाकी', 'तम्मा तम्मा लोगे', 'बम्बई से आया मेरा दोस्त', 'ऊलाला ऊलाला', 'तुने मारी एंट्रिया' ही बप्पी लाहिरी यांची गाजलेली बॉलिवूडची गाणी आहेत.
बप्पी लाहिरी बप्पीदा म्हणूनदेखील ओळखले जात.