या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमला हॅरिस यांच्या विजयासाठी तामिळनाडूतील मूळ गावात प्रार्थना करण्यात आली.
या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत आहे.
सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस या पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प 2016 साली पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते.
आता व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करत आहेत.
दोन्ही नेते विजयासाठी जोरदार प्रचार करत आहेत.
निवडणुकीच्या निकालांचा परिणाम अमेरिकेच्या अंतर्गत धोरणांवरच नव्हे तर जागतिक राजकारणावरही होणार आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण जागाचे लक्ष लागले आहे.