जर तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तरी काळजी करण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. यासाठी फक्त एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे. ओळखपत्र नसलं तरी चालेल, पण अधिकृत मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही घरी येणाऱ्या निवडणूक स्लिपची प्रिंटआउट घेऊन जाऊन मतदान करू शकता. फक्त या निवडणूक स्लिपसोबत तुम्ही खालील पैकी एक कागदपत्र मतदान केंद्रावर घेऊन जाऊ शकता: 1. पासपोर्ट 2. आधार कार्ड 3. पॅन कार्ड 4. ड्रायव्हिंग लायसन्स 5. मनरेगा कार्ड 6. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं आयडी कार्ड 7. फोटो असलेलं पेन्शन कार्ड