महाराष्ट्राचा पहिला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला आहे. नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पहिला विजय मिळाला आहे. राज्यात महायुतीला पहिला धक्का बसला आहे. नंदुरबारमध्ये भाजपच्या उमेदवार हिना गावित यांचा पराभव झाला आहे. सुरुवातीच्या कलांपासून गोवाल पाडवी यांनी आघाडी घेतली होती. आठव्या फेरीनंतर पाडवींनी एक लाखांची आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम राहिली आहे. हिना गावित यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचार सभा घेतली होती. तर, गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी प्रचार केला होता. पंतप्रधान मोदी यांनी हिना गावित यांचा प्रचार केला, तरी नंदुरबारच्या जनतेने गोवाल पाडवी यांनी कौल दिला आहे.