शरद पवारांच्या राष्ट्रवादीची हवा, 10 पैकी 10 जागांवर आघाडी लोकसभा निवडणुकीच्या निकाल थोड्याच वेळात हाती येणार आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघाचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलीच आघाडी घेतली आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवली होती. त्या सर्व 10 पैकी 10 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. अजित पवारांनी फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमानं पक्ष बांधणी केली. शरद पवार यांनी लोकसभेसाठी दिवसरात्र प्रचार करत मोठं यश मिळावलं आहे. सुरुवातीच्या कलामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व 10 पैकी 10 जागांवरील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. दिंडोरीमध्ये राज्यमंत्री भारती पवार आणि भिवंडीमधील राज्यमंत्री कपिल पाटील यांना झटका बसला आहे. सुरुवातीच्या कलामध्ये हे दोन्ही उमेदवार पिछाडीवर असून शरद पवार यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.