नाशिकमधून शिंदेंचे शिलेदार पराभवाच्या छायेत



नाशिकमधून शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत असून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे तब्बल 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.



लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) अवघ्या तासांत हाती येणार आहे.



येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.



नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दहाव्या फेरी अंती तब्बल 94 हजार 735 मतांची आघाडी घेतली आहे.



तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे पराभवाच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे.



नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होत आहे.



राजाभाऊ वाजे यांना पहिल्या फेरी अखेरीस 10752 मतांची आघाडी घेतली होती.



राजाभाऊ वाजे सध्या एक लाख मतांनी आघाडीवर आहेत.



यामुळे नाशिकमधून हेमंत गोडसे हे सध्या पराभवाच्या छायेत असल्याचं म्हटलं जात आहे.



Thanks for Reading. UP NEXT

महाराष्ट्रात पहिला खासदार जवळपास निश्चित

View next story