महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित झाला असून नंदुरबारमधून गोवाल पाडवी (Goval Padvi) हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.



नंदुरबारमध्ये भाजपच्या उमेदवार हीना गावित (Heena Gavit) या पिछाडीवर आहेत.



आठव्या फेरीअखेर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी हे तब्बल 1 लाख 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत.



त्यामुळे काँग्रेसचा महाराष्ट्रात पहिला विजय निश्चित मानला जात आहे.



हिना गावित यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती.



तर गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी सभा घेतली होती.



नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मधल्या काळात भाजपाने येथे बस्तान बसवले होते.



मात्र आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेस काबीज करणार असे दिसून येत आहे.



Thanks for Reading. UP NEXT

4 जूनला निकाल जाहीर झाल्यानंतर दारुविक्रीला परवानगी!

View next story