मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की.....



असा एकच आवाज दुमदुमला आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.



एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.



आज राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.



त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.



केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.



एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.



गोव्याहून आल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.



शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.



एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार