अतिशय प्राचीन काळापासून विठुरायाच्या या नगरीत शिल्पकला जोपासली जाते



इथे बनवलेल्या शेकडो आकर्षक दगडी मूर्ती देशभर आणि अगदी सातासमुद्रापार जात असतात



गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे कोणतीच यात्रा होऊ न शकल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता.



आषाढी महासोहळ्यासाठी मागणीनुसार दगडी मूर्ती बनवण्यासाठी कारागीर सध्या रात्रंदिवस झटत आहेत.



यात्राकाळात या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते.



त्यामुळे यंदा आषाढीसाठी मोठ्या प्रमाणात या मूर्ती बनवून ठेवण्यात आल्या आहेत.



उच्चशिक्षण घेऊनही तरुण मूर्तीकलेतच आपले करियर करत आहे.



विठुराया आणि विविध संतांच्या मूर्ती हे पंढरपूरचे खास वैशिष्ट्ये असते.



दहा हजार रुपयांपासून पाच लाखांपर्यंत विविध आकारात या दगडी मूर्ती बनवल्या जात असतात.