हिवाळ्यात बहुतेक लोकांना सांधेदुखीची समस्या होते.

दुखापत झाल्यास किंवा म्हतारपणात ही समस्या जास्त होऊ शकते.

थंडीच्या वातावरणात सांध्यांच्या धमन्या अंकुचन पावल्याने सांध्यामधील रक्ताभिसरण प्रक्रिया निट होत नाही.

त्यामुळे वेदना आणि जडपणा सुरु होऊ शकतो.

यावर अनेक घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

ताडासन, वीरभद्रासन आणि दंडासन करून तुम्ही संदेदुखीवर आराम मिळवू शकता.

सांधेदुखी कमी करण्यासाठी मासे, फळे, भाज्या आणि ग्रीन टीचा आहारात समावेश करावा.

सांधेदुखीपासून अराम मिळवायचा असल्यास तुम्ही आल्याचे तेल वापरू शकता.

तसेच सांधेदुखीपासून अराम मिळवण्यासाठी अर्धा चमचा आले आणि हळद एक कप पाण्यात १० मिनिटे उकळवा.

त्यानंतर ते गाळून त्यात मध मिसळा.