हिवाळ्याच्या दिवसात सूर्यप्रकाशाचा आनंद घ्यायला सर्वांनाच आवडते.

उबदार सूर्यप्रकाशात बसल्याने शरिराला उष्णता मिळते.

तसेच सूर्यप्रकाशात बसल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

त्याचबरोबर सूर्यप्रकाश घेतलयने रोगांशी लढण्यास मदत होऊ शकते.

हिवाळ्यातही सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळते.

आपले शरीर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर व्हिटॅमिन डी तयार करते.

व्हिटॅमिन डी हे शरिरातील हाडांसाठी खूप महत्वाचे मानले जाते.

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत आणि कोरडी होतात आणि तुटण्याचा धोका वाढू शकतो.

त्यामुळे हिवाळ्यात दररोज काही वेळ सूर्यप्रकाशा घेणे महत्वाचे मानले जाते.