दुधाचे सेवन निरोगी राहण्यास मदत करते.

दुधात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते.

ज्याचा फायदा शरिराला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

पण अनेकांना दूध पिण्याची योग्य वेळ माहितीच नसते.

जाणून घ्या कोणत्या वेळेत दूध प्यावे.

सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे चांगले?

अर्थात यावर लोकांची वेगवेगळी मते असू शकता.

पण, तज्ञांचे असे मत आहे की रात्री दूध प्यायला हवे.

रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

तसेच शरीर दुधातून जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून घेते.