सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली आहे
लायगर सिनेमाच्या फंडिंग प्रकरणी हैदराबादमध्ये विजय देवरकोंडाची चौकशी करण्यात आली.
ईडीने बुधवारी (30 नोव्हेंबर) अभिनेता विजय देवरकोंडा याची 'लायगर' चित्रपटाच्या फंडिग प्रकरणी चौकशी केली
हैदराबाद (Hyderabad) येथील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात अभिनेत्याची सुमारे 9 तास चौकशी करण्यात आली.
चौकशीनंतर यासंदर्भात विजय देवराकोंडानं प्रतिक्रिया दिली आहे.
तो म्हणाला की, लोकप्रियता मिळाल्यानंतर काही समस्या आणि दुष्परिणामही भोगावे लागतात.
हा एक अनुभव आहे, हे जीवन आहे. मला बोलावल्यावर मी माझं कर्तव्य निभावलं, मी येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.
ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर विजय देवरकोंडानं माध्यमांनाही आपली प्रतिक्रिया दिली