स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे. 2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते. तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. मात्र ती आपल्या मतांवर ठाम असते. स्वराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात ती फार सुंदर दिसत आहे. गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. या लुकमध्ये स्वरा अगदीच भन्नाट दिसत आहे ती सोशल मीडियावर सातत्यानं अपडेट असते. तिचे फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. (photo: reallyswara/ig)