बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकचा शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. शहजादा हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शहजादा चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. शहजादा चित्रपटानं ओपनिंग-डेला 6 कोटींची कमाई केली. शनिवारी (18 फेब्रुवारी) या चित्रपटानं भारतामध्ये 6.65 कोटींची कमाई केली आहे. शहजादानं रविवारी (19 फेब्रुवारी) म्हणजेच तिसऱ्या दिवशी 7.55 कोटींची कमाई केली आहे. कार्तिक आणि क्रितीच्या शहजादा या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई आता 20.20 कोटी झाली आहे. शहजादा हा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. शहजादा या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.